मी लहान असताना मैदानावर शाखा भरलेली पाहून शाखेत गेलो. आमच्या घरच्यांनी कधी जा म्हणून म्हटले नाही व नको जाऊ असेही म्हटले नाही. आधी शाखेतले खेळ, त्यांची प्रार्थना हळू हळू शिबिरं असे होत होत मग जेव्हा मी आर्मीत गेलो तेव्हा शाखा सुटली. पण मागे वळून पाहतो तर मला हे आठवते -
मी शाखेत असताना कोणत्याही धर्मीयांबद्दल कधीही खडे फोडले नाहीत शाखेतल्या शिक्षकांनी.
उच्च, निच जात पात कथीही शिकवली नाही.
शारीरिक खेळ, बौधिक (त्या मध्ये सुद्धा छान छान गोष्टी असायच्या - बऱ्याचशा गोष्टी पुढे शिव खेरा ह्या लेखकाच्या यु कॅन विन ह्या पुस्तकात वाचाल्या.
शिबिरातून रेजिमेंटेशन, सूर्यनमस्कार, प्राणायाम, छान गोष्टी इत्यादी असत.
संघटनेच्या प्रथा (ऑर्गनायझेशनल स्कील्स), सॉफ्ट स्किल्स, सभा धीट पणा व रेजिमेंटेशन हे सगळे शिकवायचे. आर्मीत जायची आवड त्यामुळेच उत्पन्न झाली.
कधीही राष्ट्रविरोधी गोष्टी शिकवल्या नाहीत.
हे सगळे असताना मला व अनेकांना म्हणूनच संघ आवडतो.