बेमालूम मिश्रण असते.

जर तुम्ही जे लिहीता, बोलता, गाता ते तुम्ही जगला नसाल तर त्याचा परिणाम साधत नाही. मी लग्न न करता लग्नावर कथा लिहीली तर तो कल्पना विलास होईल आणि त्याच्याशी कुणी कनेक्ट होण्याची शक्यता फार कमी. पण मी नुसती लग्नावर कथा लिहीली तर  ते प्रसंग वर्णन होईल, फार तर वाचलं आणि सोडून दिलं इतकाच त्याचा उपयोग होईल, माझ्या अनुभवातच काहीतरी वेगळं असलं पाहीजे. 

याही पुढे मग सृजनात्मकता आहे, माझा अनुभव नुसता दारूण असेल तर तुम्ही फक्त निराश व्हाल आणि मग मी तो तुमच्यावर अन्याय केल्यासारखं होईल, माझं दुःख वाटायला मी तुम्हाला वेठीला धरल्या सारखं होईल आणि मला तरी ते अतिशय अयोग्य वाटतं. सृजन म्हणजे आपल्या अनुभवातून दुसऱ्याला आनंद होईल, जगायला मदत होईल असं काही तरी करणं; लिहीता येतंय, सोय आहे, वेळ आहे म्हणून उगीच काही तरी उतरवून काढणं याला मी तरी सृजन मानत नाही. तुझा प्रतिसाद नेहमी पहिला असतो, माझ्याच नाही तर कुणाच्याही चांगल्या लेखनावर, ही उत्सफूर्तता कायम ठेव यातून आपण शिकत जातो, धन्यवाद!

संजय