खूप खोलवर परीणाम करणाऱ्या घटना या माझ्या अनुभवाप्रमाणे स्वतःवर अन्यायकारक असण्याची शक्यताच जास्त असते. आयुष्यभर माणूस "सेल्फ-पिटी" मध्ये बुडून जगत असेल तर त्यातून बाहेर येण्याचा एक मार्ग म्हणजे इतर लोक सुद्धा आपल्यासारखेच दुर्दैवी आहेत हे त्याला समजणे. अशावेळी जर एकमेकांच्या वह्या वाचून काही फायदा होत असेल तर उत्तमच.  स्वतःचे दुःख (रेघ) लहान करण्याचा उत्तम उपाय अधिक मोठी रेघ त्या रेघेशेजारी ओढणे हाच नाही का?

सहज एक कविता आठवते "पंखुरी सिन्हा" या कवयित्रीची -

पर मेरे कंधों पर तुम्हारे पंजों की खरोंच के निशान हैं,
और क्यों रखूँ मैं इन्हें?
सिर्फ़ इसलिए कि ये तुम्हारे दिए हुए निशान हैं?
नहीं, मैं बताऊंगी नहीं तुम्हें,
पर मैं धो रही हूँ इन्हें,
दूब की नर्मी से,
ओस की ठंडक से,
धो रही हूँ तुम्हारे खुरों के निशान,
अपने कंधों पर से
दुर्घटना सड़क पर नहीं, मेरे अंदर घटी है,
पर मैं बताऊंगी नहीं तुम्हें
अब तुम मेरे राजदार नहीं रहे...