काटा आला. अशी वही कोणाच्याही हाती द्यायची नाहीये, याची खात्री असली तरी हे करणं - स्वतःच स्वतःला असं सामोरं जाणं - मला जमेल का?

नायकाचं यापुढंचं आयुष्य किती बंधमुक्त असेल, याची कल्पनाच करणं केवळ शक्य आहे. कारण यात वर्णन केलेल्या प्रक्रियेचा एक सहस्त्रांश इतका भाग मी स्वतः अनुभवला आहे. पण पुढे सरकण्याचं धाडस अजून होत नाही.

वरच्या प्रतिक्रियेतल्या २ऱ्या प्रश्नाचे उत्तर मलाही हवे आहे.

लेखक त्याच्या लेखनातून व्यक्त होऊनही बराचसा स्वतःपाशी - अव्यक्त असा उरतो. त्या अव्यक्ताबद्दल किती  कुतुहल वाटावं हे त्याने लिहिलेले शब्द ठरवतात.  तुमचं लेखन वाचताना कायमच हे कुतुहल अपार वाटत असतं. तुम्ही लिहिलेल्या गोष्टी इतका अशक्य विचार करायला लावतात, की न लिहिलेल्या ऐकून घेणं तरी झेपेल का, असा प्रश्न पडतो.

आभार.