मला आपले निरीक्षण आवडले. पटले.

मला नेहमी वाटते की समाजात राहायचे म्हणजे प्राथमिक सुचार शिकले पाहिजेत व वापरले पाहिजेत. त्यांनी स्वतःचाच फायदा होतो. दुसऱ्यांना भेटल्यावर त्याचे पहिल्यांदा अभिवादन करावे. त्यांनी एकमेकांत नाते जोडले जाते व दुसरा आपल्याला काय म्हणायचे आहे त्याकडे जास्त चांगल्या भावनेने लक्ष देतो. हसतमुख राहावे आणि व्यवहार आटोपल्यावर दुसऱ्याला धन्यवाद द्यावेत. अशा करण्याने जोडलेले नाते वाढीस लागते. ह्या सोप्या तीन गोष्टी आचरणात आपण आणल्या तर एकदुसऱ्यात मेळ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, एक नाते तयार होईल, सद्भावना वाढीस लागेल व त्या योगे दोघांचा फायदा होईल.

कळावे लोभ असावा

दुवा क्र. १

दुवा क्र. २