प्रथम, प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार
ही कथा आहे, यात घटना आणि कल्पनेचं मिश्रण आहे
या कथेला जो आध्यात्मिक पैलू आहे त्याला ख्रिश्चन धर्माच्या 'कन्फेशन' या प्रणालीचा आधार आहे. ख्रिचन धर्मानी मात्र कन्फेशन ही मन निर्भार करू शकणारी प्रक्रिया पूर्ण निरूपयोगी केली आहे
आता वैयक्तिक उत्तरं
ज्ञानेश, ही प्रक्रिया आता होत नाही. या कथेचा अजून एक क्लायमॅक्स आहे मग तुम्हाला नातं या नांवाचा अर्थ कळेल
सहदेव, या प्रक्रियेतून मला कळलेला आणि तुम्हा सर्वांना उपयोगी होईल असा एक भाग आहे 'आपली गुपीतं फक्त आपल्यासाठीच महत्त्वाची असतात, दुसऱ्यांना त्याचं काही विशेष वाटत नाही'. या प्रक्रियेमुळे माझ्यात अंतर्बाह्य एकरूपता आली म्हणजे माझ्या विचारात आणि वागण्यात एकसंधता आली, माझं व्यक्तीमत्व एकसंध झालं ज्याचा पुढे मला व्यक्तिमत्वातून मोकळं व्हायला उपयोग झाला.
सारीका, व्यक्तीमत्व हा तो कोष आहे आणि तुम्ही त्यातून मोकळे झालात की आकाशी होता ही अध्यात्माची फलश्रुती आहे.
ऋतुपर्ण, विपश्यना तुम्हाला व्यक्तीमत्वातून मोकळं करत नाही, श्वासाशी अनुसंधान साधून वर्तमानात आणायचा प्रयत्न करते, ती प्रक्रिया फारशी उपयोगी नाही.
नगरीनिरंजन , आभार
ध्येयहीन, वरच्या प्रतिसादात मी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. कथेचा उद्देश मला काय फायदा झाला हे सांगणं हा नाहीये तर माझ्या अनुभवातून, ही प्रक्रिया न करता, तुम्हीही भूतकाळापासून मुक्त होऊ शकता हा आहे कारण तुमच्या भूतकाळात फक्त तुम्हाला रस आहे दुसऱ्या कुणालाही नाही (कारण त्याला त्याच्या भूतकाळात रस आहे) इतकं ते सोपं आहे.
गणेश, धन्यवाद!
पुढचा भाग तुम्हाला आणखी उपयोगी होईल
संजय