चाळणी लावायची की नाही हा १ मुद्दा आणि कशी लावायची हा २ रा मुद्दा.

लावायचीच झाली तर सर्वच साहित्य प्रकारांना चाळणी लावावी लागेल. फक्त कविता का?

________

कशी लावायची म्हणाल तर - कवितेला अनंत पदर असतात. उद्या तो कवी/ ती कवयित्री हे म्हणू शकेल की संपादकांना एखादा पदर कळला नाही आणि त्यांनी न समजताच कात्री लावली.

_____

मला वाटतं आहे ते बरं आहे, ज्याला जे हवं ते तो वाचतो आणि घेतो. कोणी कोणावर सक्ती केलेली नाही की कवितांच्या पानावर जाऊन कविता वाचाच म्हणून. मी स्वतः क्वचितच कविता वाचते.

____

संपादकांचे काम हे आहे की कोणी अश्लील, कायदेबाह्य, विकृत गोष्टींकरता या व्यासपीठाचा वापर तर करत नाही ना हे पाहणं, असं मला वाटतं.