वाक्यरचना सुगम तर हवीच, पण त्याशिवाय लिखाणात एकसुरीपणा तर येत नाही ना इकडे  ध्यान असले पाहिजे.
वर लिहिलेल्या लेखात पहिल्याच परिच्छेदात 'ह्या' चारदा आला आहे. दुसरा 'ह्या'तर पूर्णपणे गैरलागू आहे. चुकीच्या समजुतींची यादी अगोदर न देताच ह्या चुकीच्या समजुती म्हणणे अनाकलनीय आहे. तिसऱ्या आणि चौथ्या ह्यांबद्दल : 'ह्या' आणि 'विषयातले' हे दोन वेगळे शब्द आहेत, ते तसेच सुटे लिहायला हवेत.  तोच प्रकार ह्या आणि निमित्ताने या दोन शब्दांबाबत!

ह्याऐवजी साधारण तशाच अर्थाचे या, त्या, सदरहू, अशा, संबंधित, विविक्षित वगैरे शब्द त्यांच्या विशिष्ट अर्थच्छटा विचारात घेऊन वापरता येतात.  लिखाण एकसुरी होऊ नये म्हणून अशा काही युक्ताप्रयुक्त्या करून पाहाव्यात.
कायद्याच्या भाषेत मात्र हव्या त्या अर्थाचा उचित शब्द एकमेव असू शकतो, तो तसाच उपयोगात आणला पाहिजे.