संजयजी, तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! पण प्रतिसाद वाचून मनात काही प्रश्न निर्माण झाले, ते खालीलप्रमाणे. कृपया मार्गदर्शन करावे.
तुमच्या म्हणण्यानुसार - 
'आपली गुपीतं फक्त आपल्यासाठीच महत्त्वाची असतात, दुसऱ्यांना त्याचं काही विशेष वाटत नाही'. 'तुमच्या भूतकाळात फक्त तुम्हाला रस आहे दुसऱ्या कुणालाही नाही (कारण त्याला त्याच्या भूतकाळात रस आहे)'.
१. आपला भूतकाळ एका तिर्हाईकाला किंवा दूरच्या मित्राला कथन करताना हे म्हणणे पटते. पण हेच कन्फेशन एखाद्या जवळच्या व्यक्तीस करायचे असल्यास, 'त्याला माझ्या भूतकाळात रस नाही' असे आपण कसे म्हणू शकतो?
२. आणि जर भूतकाळाचे ओझे आपल्या निकटच्या व्यक्तीकडे किंवा त्या भूतकाळाचा ज्या व्यक्तीवर सगळ्यात जास्त परिणाम होईल अशा व्यक्तीकडे कथन न केल्यास ते ओझे कमी कसे होणार?