या प्रयोगात मुलांचा संयम तपासलेला दिसत आहे. संयम अतिशय उपयुक्त गुण आहे. निर्विवाद पणे, यशासाठी अत्यंत आवश्यकही. कदाचित संयमी लोकांमध्ये यश मिळवण्यास आवश्यक इतर गुणही आपसुक निर्माण होत असतील.
मुलांना शिस्त लावण्याशी या संयमाचा काही संबंध प्रस्थापित करता येतो का? म्हणजे एखादी (अनावश्यक, अयोग्य) गोष्ट मागीतल्यावर (लगेच) न देण्याने मुले अधिक संयमी होतात, आणि वरील प्रयोगात शास्त्रज्ञ परत येई पर्यंत गोळ्या खायची थांबतात, असा प्रयोग झाला आहे का? की वरील मुले उपजतच तो गुण घेऊन आलेली असतात?
असो... शीर्षक वाचून तत्काळ इच्छापूर्तीचा एखादा मंत्र वा तंत्र समजेल असे वाटून लेख मोठ्या अपेक्षेने उघडला... पण...