भूतकाळ ही होऊन गेलेली गोष्ट आहे, कोणत्याही प्रक्रियेनी आता त्याचं काहीही करता येणार नाही, ती काळ्या दगडावरची रेष आहे ...पण ती रेष दुसरीकडे कुठे नसून फक्त तुमच्या मनात आहे.

भूतकाळ फक्त आठवू शकतो आणि आठवणींनी एकच होतं वर्तमानकाळ दुःखद होतो! भूतकाळाची सगळी शक्ती तुमच्या वर्तमानात न राहाता येण्यावर आहे.

लिखीत कन्फेशनमुळे एकच होतं तुमचे डोक्यातले प्रश्न डोळ्यासमोर येतात! तुम्ही कन्फेशन कुणासमोर करायला हवं असं नाही, अशी लिहिलेली वही कोणत्याही दगडासमोर वाचली तरी तोच परिणाम होतो, तुम्ही भूतकाळातून मुक्त होता!

जेव्हा बिकट प्रसंगात आपण एखाद्या मूर्तीसमोर साकडं घालतो तेव्हा अगदी हेच होत असतं, प्रश्न सुटेल की नाही हा भाग वेगळा पण तुम्ही प्रश्नापासून मुक्त होता! ही त्यातली सायकॉलॉजी आहे.

या ही पेक्षा एक सोपा उपाय आहे, तुम्ही भूतकाळात जाण्यानी वर्तमान धूसर होतो हे मनोमन जाणलं की  मग तुम्हाला कोणतिही प्रक्रिया करायला लागत नाही. विस्तवाला हात लावल्यावर चटका बसतो हे दोन तीनदा कळलं की बास!

तुम्ही तिसरा भाग वाचा, जेव्हा मी बायकोला सांगीतलं की 'आपली कितीही भांडणं होवोत, मतभेद होवोत पण एकमेकांशी अबोला धरायचा नाही, संवाद तुटला की नातं संपतं! ' त्यानि हाच परिणाम साधला आम्ही नेहमी वर्तमानात राहायाला लागलो. तुम्हाला एकदा वर्तमानात राहण्याची मजा आणि विधायकता कळली की भूतकाळ व्यर्थ होतो.

ऋतुपर्ण एक गोष्ट मात्र मी मनोमन सांगेन तुम्ही जर तुमचा भूतकाळ तुमच्या जवळच्या व्यक्तीला कथन केलात तर ती व्यक्ती तुमच्या समोर आल्यावर पुन्हा पुन्हा तुमचा भूतकाळ सक्रिय होत राहातो. यू हॅव नाऊ मेड टू रेकॉर्डींग्ज ऑफ युवर पास्ट.

तुमच्या भूतकाळातली एखादी घटना तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या वर्तमानावर परिणाम करणार असेल तर मात्र प्रामाणिकपणे त्या व्यक्तीला, तिच्याकडून तुमचा होणारा फायदा न बघता, कोणतंही नातं जोडण्यापूर्वी तशी पूर्वकल्पना देणं  नेहमी श्रेयस आहे. नित्शे हेच म्हणतो 'नॉट टू यूज द अदर इज दी हायेस्ट मोरॅलिटी'.

संजय