या पुस्तकात अशाच एका प्रयोगाचा उल्लेख आहे. त्यात असे होते की ताबडतोब हवे असल्यास एकच मार्श मेलन मिळेल, दोन तासांनीं (किंवा अशाच कालावधीने - अचूक कालावधी आतां लक्षांत नाहीं) खाल्ल्यास आणखी एक मिळेल. फार थोड्यांनीं दुसरा पर्याय निवडला. दहापंधरा वर्षांनंतर त्याच मोठ्या झालेल्या मुलांच्या प्रगतीचा आढावा घेतल्यावर असें दिसून आलें कीं दुसरा पर्याय निवडणाऱ्या मुलांनीं फार प्रगती केली होती आणि पहिला पर्यायवाले बहुतांशी सामान्यच राहिले.
सुधीर कांदळकर