मराठी शब्दांना मराठीतूनच प्रतिशब्द देणारे अनेक शब्दकोश आहेत, त्यांतील बरेच जालावर आहेत, शोधले की सहज मिळावेत.  बहीण या शब्दासाठी स्वसा या शब्दासारखे संस्कृत शब्द अनेक आहेत, मराठीत अधिक शब्द नाहीत.  पण अक्का, ताई, जिजी , पाठली, पाठीवरची हे शब्द बहीण हा अर्थ सुचवतात.