श्री. सर्वसाक्षी,
आपण विशद केलेली समस्या अंतर्मुख व्हायला लावणारी आहे. भाषा विषय शिकविणाऱ्यांपुढे नक्कीच डोंगरा एवढी समस्या असणार.
माझ्या मते, कुणाही भाषा शिक्षकाची जबाबदारी नुसती तो ज्या भाषा विषयात प्रविण आहे ती भाषा शिकविण्या इतपत मर्यादीत नसून त्या भाषेची गोडी समोरच्या मठ्ठ विद्यार्थ्यात निर्माण करण्याचीही आहे. नुसते बी.एड करून शिक्षकाची नोकरी मिळेल पण तो उत्कृष्ट शिक्षक नाही होऊ शकत. त्या साठी शिकविण्याची उर्मी आतुन असावी लागते. नुसती उर्मी असूनही भागत नाही. आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक ती हातोटी आत्मसात करावी लागते. असो.