या लेखनाचा हेतू फारसा लक्षात नाही आला.
१) सुरुवातीला गुरुजींनी जो प्रयोग केलेला आहे, त्या बद्दल लेखकाचे मत कळले नाही. स्वतःच्या टिचभर आयुष्यातिल गुह्ये या प्रकारे एखाद्या कागदावर लिहून काढणे, हे खरोखरच खूप कठीण आहे, आणि त्यासाठी फार मोठे धैर्यही लागेल. जास्त विचार करू लागल्यास त्यासाठी लागणारे धैर्य हे चिखलात पहिले पाऊल टाकावयास लागणार्या मनाच्या तयारी प्रमाणे आहे. एकदा अंगाला चिखल लागला की नंतर त्यात लोळायला फार कठिण जात नाही. पहिले पाऊल मात्र खूप कठिण. एकुण तो प्रयोग 'काहितरी वेगळे (विचित्र)' करून दाखवण्यासाठी किती, आणि व्यक्तिंची आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी किती असा प्रश्न पडतो. जवळजवळ सर्वांनाच त्यात अपयश आल्यावर गुरुजींची त्यावरील प्रतिक्रीया ही पहिल्या पर्यायास (काहितरी वेगळे) पुष्टी देते. आध्यात्मिक प्रगती साठी आपले म्हणून काही ठेवायचे नाही असा संदेश देण्यासाठी असे एक घाव दोन तुकडे करण्यापेक्षा अधिक चांगले काहितरी करता आले असते. त्या मुळे या सर्व प्रकाराला awesome असे म्हणून सोडून द्यावेसे वाटते.
२) प्रेम या भावने बद्दल लेखकाचा प्रश्न, आणि त्या पुढे घडणार्या घटना, यांचा या आधिच्या भागाशी काहीच संबंध जोडता येत नाही. वरील प्रयोगाच्या निरुपणात प्रेम हा शब्द येतो काय (यायला खरे तर काहीच हरकत नाही). लेखकाला त्याचा मूलभूत अर्थ जाणून घ्यायची इच्छा होते काय. गुरुजींना उत्तर येत नाही, लेखक स्वतःसाठी एक उत्तर शोधतो... पुढे गुरुजींचे होणारे लग्न वगैरे.... हे सर्व असेच घडलेले असू शकेल.. पण आपल्या आयुश्यात अश्या अनेक घटना घडत असतात. प्रेम शब्दाच्या अर्थाचा आधी लिहीलेल्या डायरीशी काहीच संबंध नाही. तो अन्यथाही शोधायची इच्छा होऊ शकते. आणि लेखकाला मिळालेला अर्थ ही मिळू शकतो.. हे सर्व एका लेखमालेत लिहीण्याचे प्रयोजन कळले नाही.
३) 'प्रेम' या भावनेच्या अर्था संबंधी. खरेतर लेखकाला आधी सुचलेले उत्तरच योग्य वाटते. एखादा माणुस प्रेयस नसलेली गोष्ट प्रेमासाठी करायला तयार होतो.. तेव्हा, ज्यासाठी मनुश्य वरवर दिसणारा तोटा करून घेण्यास तयार होतो.. ते प्रेम असे थोडक्यात म्हणता येईल.. उदा. आई मुलासाठी करत असलेला त्याग, देशभक्त देशासाठी करत असलेला त्याग वगैरे (त्याग केला म्हणजेच प्रेम असते असे नव्हे, तर प्रेम असल्यास त्याग करण्याची तयारी असते). आणि या सर्वांमागे आपण, आपले कुटुंब, आपली जमात, देश, मानव जात वगैरे 'टीकून राहणे' ही मूलभूत प्रेरणा असते. असे एकमेकांविशयी प्रेम नसते तर मानव जात कदाचित एवढी फोफावली नसती.
प्रेमाची पारदर्शकतेशी घातलेली सांगड आवडली. तशी पारदर्शकता असल्यास प्रेम कायम टीकते हेही खरे आहे. परंतु प्रेम आणि पारदर्शकता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पारदर्शकते शिवाय प्रेम असू शकते (आई- लहान मुलगा, रुग्ण - त्याचा हितचिंतक) आणि प्रेम नसतानाही एखाद्या माणसाकडे पारदर्शकता असू शकते (अश्या माणसाचे कदाचित स्वतःच्या पारदर्शकतेवरच प्रेम असू शकेल).