लक्षात येईल.

त्यातूनही माझं लेखन निव्वळ मनोरंजनासाठी नसतं त्याला आध्यात्मिक पैलू असतोच त्यामुळे तुम्हाला ओपन माइंडनेच वाचायला हवं, तुमच्या धारणा, माझ्या विषयीचे पूर्वग्रह (असतील तर) दूर ठेवून वाचायला हवं तरच काही तरी हाती लागेल. त्यातून आपल्याला माहिती आहेच असा समज असेल तर मग वाचण्याची तसदीही न घेणं बरं.

१) सत्य समजायला एकमेव अडसर म्हणजे आपण स्वतःला व्यक्ती समजतो हा आहे आणि व्यक्तिमत्त्व हे पूर्णपणे भूतकाळामुळे बनले आहे. या भूतकाळापासून मुक्तीचे अनेक प्रयोग आहेत, सर्वमान्य भारतीय प्रयोग संन्यास असून, प्रचलित ख्रिश्चन प्रणाली कन्फेशन आहे. आपल्या भूतकाळात सर्वस्वी शिरणं हे इथे प्रतिसाद लिहण्या इतकं सोपं नाही कारण सगळ्या असह्य घटना माणूस मोठ्या प्रयासानं विस्मृतीत घेऊन गेलेला असतो

२) एकदा व्यक्तिमत्त्वाचं निरसन झाल्यावर दुसराही व्यक्ती नाही हे तुमच्या लक्षात येतं.

मी इथे वन-टू-वन बोलत नसल्यानं मला वाचणारी 'व्यक्ती' आहे हे लक्षात ठेवून लिहायला लागतं आणि वाचणाऱ्याचं 'व्यक्तिमत्त्व निरसन' हा लेखनाचा हेतू असतो. व्यक्तिमत्त्वाचं निरसन तुम्हाला आधी एकसंध (इंटीग्रेटेड) आणि मग पारदर्शक बनवतं. हा अनुभव यायला तुम्हाला स्वतःला आध्यात्मिक साधनेतून जायला हवं, चर्चेनं अनुभव येणार नाही. 

'प्रेम' हा 'सत्य' या शब्दाचा पर्यायवाची आहे पण ती एकदम अंतिम मजल आहे, संबंधातल्या पारदर्शकतेपासून सुरुवात आहे.

३) अधिक माहिती (हवी असल्यास) माझा 'प्रेम' हा सतरावा लेख वाचावा

संजय