या दोन्हीच्या उच्चारणात नेमका काय फरक आहे ते कुणी सांगू शकेल का? रफारातला र हा आधिच्या अक्षरा नंतर येणारा (म्हणजे अनुस्वारातील अनुनासिका सारखा) आणि ऱ्ह मधिल र हा या अक्षरापूर्वी येणारा वाटतो. पण उच्चारातील फरक नेमका लक्षात येत नाहीये.