माझी साप्ताहिकी येथे हे वाचायला मिळाले:
एकदा थंडी सुरु झाली की सा-यांनाच जरा बरे वाटते. बाकीचे दिवस आपले घाम पुसण्यातच जात असतात. कपाटाच्या तळाशी बोचक्यात बांधलेले स्वेटर, मफलर, कानटोप्या बाहेर आल्या की हे कौतुक होळीची बोंबाबोंब होईपर्यंत पुरते. या काळात आणखी एक हुडहूडी लोकांना भरते. आणि ती म्हणजे साहित्यिक हुडहूडी. थंडीचा काटा अंगावर फुलण्याआधीच दिवाळीपुर्वी या साहित्य संमेलनाचे वारे सुरु होतात. अध्यक्षपदाच्या निवडणूकांसाठी मोर्चेबांधणी सुरु होते. हा विदर्भातला, हा पश्चिम महाराष्ट्रातला, हा ...