सूर्य हा संस्कृत शब्द आहे, आणि त्यातले र्य हे जोडाक्षर आहे. संस्कृत शब्दातले जोडाक्षर उच्चारताना जोडाक्षराआधी एखादे अक्षर असेल, तर त्या अक्षरावर जोर(=आघात) येतो. त्यामुळे सूर्यचा उच्चार सूर्‌र्‌य असा काहीसा होतो. सुऱ्याला हा मराठी शब्द, तो उच्चारताना 'सु'वर जोर येत नाही.
सुऱ्याला, ऱ्हास असले शब्द टंकित करताना कॅपिटल आर वापरावा.
संस्कृत शब्दातले रफारापूर्वीचे अक्षर दीर्घ असते. अपवाद : निर्, दुर्, आणि उर्‌ने सुरू होणारे निर्माण, दुर्योधन, उर्वशीसारखे  शब्द. (ऊर्मिला, ऊर्जा, दूर्वा यांतले उकार दीर्घ आहेत.) 
संस्कृतमध्ये नसलेली पण मराठीत असलेली काही जोडाक्षरे : ऱ्य, ऱ्ह, म्ह, ल्ह, आणि ल्य, ळ्य, व्य, ड्य वगैरे यची जोडाक्षरे. ही अक्षरे असलेले शब्द उच्चारताना आधीच्या अक्षरावर जोर येत नाही.
उदाo कोल्हापूर, कोल्ल्हापूर नाही;  तुम्हाला, तुम्म्हाला नाही. तसेच केल्याने, व्याह्याने, मुळ्या, जोड्याने वगैरे.