दर्या आणि दऱ्या ह्यातल्या र च्या उच्चारांतला फरक समजून घ्यायला / द्यायला मी ही एक सोपी युक्ती करतो
दर्या म्हणताना दर् .... या असे मध्ये थोडा वेळ देऊन म्हणावे. हे झाले की मधला रिकामा वेळ क्रमाक्रमाने कमी करीत न्यावा, आणि पुन्हा पुन्हा म्हणावे. सरतेशेवटी हा वेळ शून्यवत झाला की होणारा उच्चार दर्या असा होतो.
दऱ्या म्हणताना द ..... ऱ्या असे मध्ये थोडा वेळ देऊन म्हणावे. हे झाले की मधला रिकामा वेळ क्रमाक्रमाने कमी करीत न्यावा, आणि पुन्हा पुन्हा म्हणावे. सरतेशेवटी हा वेळ शून्यवत झाला की होणारा उच्चार दऱ्या असा होतो.
करून पाहावे.