मराठी ही स्वभाषा म्हणून मी आत्मविश्वासाने वापरतो. यापेक्षा अधिक अधिकार कोणाचाही नसतो.

बरोबर. मराठीत अधिकाधिक नवनवे शब्द, वाक्प्रचार येण्याच्या दृष्टीने ह्याकडे बेरजेच्या दृष्टीनेच बघायला हवे असे मला वाटत असल्याचे मी इतरत्रही लिहिलेले आहे. मात्र येथे चाललेले मतमतांतर ह्या एकंदर सर्वसाधारण प्रक्रियेबद्दल नसून एका/एखाद्या विशिष्ट शब्दाबद्दल आहे असे वाटते. येथे हा एखादा शब्द (संग्रहणीय) इतर रूढ शब्दांशी (संग्रहणी) संबद्ध 'वाटत असल्या'मुळे (आणि रूढ शब्द उत्सर्जनसंस्थेच्या विकाराबद्दल असल्याने) नकोसा झाला असावा असे मला वाटते. (मला स्वतःला वर मी लिहिलेल्या ('कविधाविंचे अर्थ वेगवेगळे असतात' ह्या मला वाटलेल्या) तर्कानुसार 'संग्रहणीय' हा शब्दच अधिक योग्य आहे असे वाटलेले होते; पण मला माझे मत सोडून द्यावे लागले. (ही खूप पूर्वीची गोष्ट आहे.))

तर्कशुद्ध वाटणारे कित्येक शब्दप्रयोग इतर रूढ शब्दप्रयोगांमुळे अशा प्रकारे सोडून द्यावे लागतात असा मला अनुभव आलेला आहे.