उपक्रमावर मी संग्रहणीय की संग्राह्य ही चर्चा सुरू केली. इथे माझे सविस्तर मत आधीच मांडले असल्याने जास्त लिहीत नाही. थोडक्यात
१. हा शब्द मराठी शब्दकोशात मिळत नाही. मी आंतरजालावरचे ३-४ पाहिले.
२. हिंदी शब्दकोशात मिळतो (वेब्स्टर्स मल्टिलिंग्वल डिक्शनरी) तसाच संस्कृत शब्दकोशात मिळतो (असे धनंजय म्हणतात).
३. मराठीमध्ये अगदी गेल्या पाच दहा वर्षांपूर्वीपर्यंत वापरात नव्हता. आरागॉर्न यांनी उपक्रमाच्या चर्चेत एक दुवा दिला आहे. त्यात संग्रहणीय शब्दाच्या मराठीतल्या वापराची उदाहरणे आहेत. पहिली दोन खुद्द धनंजयांचीच उपक्रमावरची मिळतात, बाकी लोकप्रभा, पुस्तकविश्व वगैरेमधली २००९ - १० मधली.
४. हा शब्द मराठीत प्रचलित नसण्याचे (गेल्या ५-१० वर्षांचा अपवाद वगळता) कारण "संग्रहणी" शब्दाशी असलेले साम्य हे असावे असे मला वाटते.
५. हा शब्द सध्या वापरात येण्याचे कारण हिंदीचा प्रभाव असे मला वाटते. तसे इतरही अनेक शब्दांबद्दल झाले आहे.
६. त्यामुळे मी नेहमीच्या वापरातला "संग्राह्य" शब्द वापरणे पसंत करतो.
यात नवीन काही नाही. आधीच मी आणि इतरांनी हे लिहिले आहे.
विनायक