गोष्टीचीजीवशास्त्रानुसार प्राणी आणि वनस्पती यांची उतरंड अशी असते.
कोटी(किंगडम)->उपकोटी(सबकिंगडम)->विभाग(डिव्हिजन)->उपविभाग(सबडिव्हिजन)->वर्ग(क्लास)->उपवर्ग(सबक्लास)->श्रेणी(सीरीज)-गोत्र(कोहर्ट)->गण(ऑर्डर)->उपगण(सबऑर्डर)->कुल(फॅमिली)->उपकुल(सबफॅमिली)->जमात(ट्राइब)->उपजमात(सबट्राइब)->वंश/प्रजाती(जीनस)->उपवंश(सबजीनस)->जाती(स्पीशीज)->
उपजाती(सबस्पीशीज)->प्रकार(व्हरायटी)->उपप्रकार (सबव्हरायटी).
त्यामुळे किंगडम=कोटी; डिव्हिजन=विभाग; क्लास=वर्ग; फॅमिली=कुल; आणि स्पीशीज=जाती. यां शब्दांपेक्षा वेगळे शब्द देण्याची आवश्यकता नाही.
परसॉनिफिकेशन हा जर वाङ्मयातला अलंकार असेल तर मला वाटते की त्याला चेतनगुणोक्ती म्हणतात. (चू. भू. द्या. घ्या. )
कल्टिव्हेशन=लागवड. मशागत म्हणजे शेती(किंवा अन्य तत्सम गोष्टीची) देखभाल. उदाo गुलाबाच्या झाडांची मशागत; डोक्यावरील केसांची मशागत, मिशांची मशागत वगैरे.
डिस्ट्रिब्यूशन म्हणजे फक्त वाटणी नाही, तर पसरण(उदाo नॉर्मल डिस्ट्रिब्यूशन); पखरण; विभागणी वगैरे वगैरे.