र फार वेळ लावून म्हणायचा नाही, तर थोडाच वेळ, पण जोर देऊन उच्चारायचा!
प्रत्यक्ष हा शब्द संस्कृत आहे, त्याचा उच्चार प्रत्त्यक्ष असा होतो. असाच उच्चार मराठी बोलणारेच नाहीत तर, संस्कृत किंवा हिंदीसकट अन्य भाषा बोलणारे सर्व भारतीय करतात.
संस्कृतमधील शब्दातले पहिले सोडून नंतरचे प्रत्येक जोडाक्षर जोर देऊन उच्चारण्याची खोड फक्त मराठीभाषकांनाच नाही, तर संस्कृत मातृभाषा असणाऱ्यांना, जर्मनी आणि अन्य देशांतील संस्कृत अभ्यासकांना, गीता, रामरक्षा, वंदे मातरम्, वेदमंत्र आदी म्हणणाऱ्यांना, जटापाठींना, घनपाठींना, याज्ञिकांना, भिक्षुकांना आणि भारतातील त्यांच्यात्यांच्या भाषेतील संस्कृत शब्द उच्चारणाऱ्या सर्वांना असते.
मराठी लोक संस्कृतमधून न आलेले बरेच मराठी शब्द कारणपरस्ते जोर देऊन आणि द्वित्त करून उच्चारतात. अन्यभाषक तसे करतात की नाही ते बघायला पाहिजे. असे काही शब्द : फिक्का, रग्गड, सुट्टे, मोठ्ठा, कप्पाळ, टप्पोरा, लब्बाड, खर्राखुर्रा, खल्लास, अव्वाच्यासव्वा वगैरे.