मुंबईच्या संमिश्र भाषेवर कोकणातील भाषेचा प्रभाव आहे.  मालवणी  ही महाराष्ट्रातील च एक भाषा आहे. त्या भाषेत अनेक पुस्तके लिहीली गेलेली आहेत, नाटके ही  होतात. 

मालवणीत 'तो देवूक मागना न्हाय' म्हणजे 'तो देत(च) नाही आहे' , 'तो जावूक मागना न्हाय' म्हणजे 'तो जात(च) नाही आहे' 

मालवणीत 'तूका गमना न्हाय' म्हणजे 'तूला दिसत नाही का? तेच गुजरातीत 'तमे गम्यो नथी' असे होते.

तसेच मालवणीतील 'ईलेलय' म्हणजे मुंबईच्या मराठीत 'आलेलो होतो', 'गेलंलय' चे मुंबईच्या मराठीत 'गेलेली होती', 'दिल्लेला होता'च्या ऐवजी 'दिलेलं होतं'