आयुष्याच्या शेवटच्या काळात बालगंधर्वांची देखभाल गौहरबाई कर्नाटकी यांनी केली. त्या प्रसिद्ध पार्श्वगायिका अमीरबाई कर्नाटकी यांच्या थोरल्या भगिनी. त्यावेळी गौहरबाईंच्या प्रभावाने बालगंधर्व मुसलमान झाले असा समज पसरला होता. म्हणूनच बालगंधर्वांच्या पार्थिवाचे दहन करायचे की दफन हा वाद झाला.

मला वाटते असाच वाद संगीतकार वसंत पवार यांच्या मृत्यूनंतर झाला होता. त्यांची पत्नी खिश्चन होती. वसंत पवारांनीही धर्मांतर केले होते. पण त्यांच्या मृत्यूनंतर दोन्ही धर्मांचे लोक पार्थिवाला हात लावायला तयार नव्हते असे ऐकले आहे.

विनायक