"संग्रहणीय" शब्दाचा अर्थ "संग्रह करण्यायोग्य" असा अर्थ त्यांना समजून येतो.
म्हणजे तसा कदाचित नसला तरी. तात्पर्य काय तर, संग्रह करण्यायोग्य हा अर्थ नसू शकतो.  यातच सर्व आले.  
त्याच धर्तीवर, मराठीभाषकांना कंदर्प म्हटले की कांदा असा अर्थ समजून येतो, खरा अर्थ कमळ असा का असेना! कंद आहे, दर्प आहे मग कांद्याशिवाय दुसरा कोणता अर्थ असणार? तसेच संग्रह आहे, अनीय आहे, आणखी काय पाहिजे?

३० वर्षांपूर्वी मी 'संग्रहणीय' असा वापर केल्यावर ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावर नापसंतीची भावना दिसलेली होती.
म्हणजे निदान तीस वर्षांपूर्वी हा नवा सोज्वळ अर्थ नव्हता. कदाचित कालपर्यंतही नसावा.  थोडक्यात सांगायचे झाले तर, संग्रहणीय या शब्दाला अलीकडे-अलीकडे एक नवा अर्थ चिकटू पाहतो आहे.  शक्य आहे.

शेवटी काय, संग्रहणीय खव्याचे पदार्थ, संग्रहणीय पोट आणि संग्रहणीय प्रकृती यांचा अर्थ सांगायचा असेल तर संदर्भ आवश्यक!
--अद्वैतुल्लाखान