उद्धृत : उपक्रमावर संग्रहणीय या शब्दाची इतकी विविधांगी(हा शब्द कोशात मिळेल याची खात्री देता येत नाही!)चर्चा झाली आहे, की यापुढच्या काळात  कोणी मराठीत संग्रहणीय म्हणण्यालिहिण्याची हिंमत करणार नाही;  इतकेच नव्हेतर, सहवास हा शब्द लिहायलापण मराठी माणूस कचरेल.
येथे सुद्धा तुम्ही मुद्द्याचे बोललात. उपक्रमावरील किंवा येथील चर्चेमुळे "सहवास" शब्द मराठीत वापरण्याबाबत कोणी कचरू लागेल,  असे झाले तर फार वाईट होईल.
हे बरे/वाईट कसे ठरविले जाईल? एखाद्याला न्यूस्पीकच आवडत असेल तर किमान शब्दांमध्ये अभिव्यक्ती होण्यालाच ती व्यक्ती 'चांगले' म्हणेल ना?
काही मुले "आपुलीशी" शब्द उच्चारताना हसतात, याची आठवण मनामधून जात नाही.
बहुमताच्या बडग्याखालीच भाषेची उत्क्रांती होते ना?