धनंजयांनी वापरला आहे म्हणून कदाचित (टंकनदोष नसल्यास)ज्वाज्वल्य बरोबर असेलही.  ते कधीकधी कर्ता या शब्दाऐवजी कर्त्‍ता वापरतात. मराठीत पहिले रूप रूढ आहे, हिंदीत दुसरे, तर संस्कृतमध्ये दोन्ही. पिपासा, जिज्ञासा(जिज्‌ञासा), मुमूर्षू, मुमुक्षू, तितीर्षा, पिपठति‌ या शब्दांत ज्याप्रमाणे फक्त पहिल्या व्यंजनाची द्विरुक्ती झाली आहे, तशीच झालेली असल्याने जाज्वल्य हेच रूप नक्की योग्य आहे.
जुगुप्सा, चिकीर्षा ही रूपे कशी होतात ते आता आठवत नाही.