... 'ज्वाज्वल्य' असा शब्दप्रयोग करणारांची मातृभाषा ('स्वभाषा') मराठी असून ते तो शब्दप्रयोग अतिशय आत्मविश्वासाने करतात, एवढी बाब 'ज्वाज्वल्य' असा शब्दप्रयोग योग्य ठरवण्याकरिता पुरेशी ठरावी, असे वाटते.
उलटपक्षी, 'जाज्वल्य' अशा शब्दप्रयोगाच्या समर्थनातील आपला तर्क कदाचित बरोबर असू शकेलही, आणि ज्याअर्थी आपण तो मांडण्याचे धारिष्ट्य केले आहे, त्याअर्थी बहुधा आपणाजवळ त्याबद्दल आत्मविश्वासही असावा, असे वाटते. परंतु ('जाज्वल्य' अशा शब्दप्रयोगाचे प्रयोजक आणि/किंवा समर्थक अशा प्रातिनिधिक नात्याने) आपली मातृभाषा ('स्वभाषा') मराठी आहे की नाही हे पुरेसे स्पष्ट होत नाही. एकदा का या बाबीबद्दल काही निश्चित आणि स्पष्ट असे निदान झाले, की मग आपले म्हणणे ग्राह्य धरावे की न धरावे याबद्दल विचार करता येईल. परंतु असे होईपर्यंत दुर्दैवाने पारडे 'ज्वाज्वल्य'च्याच बाजूने झुकते, असे खेदाने नमूद करावेसे वाटते.
आपली मातृभाषा ('स्वभाषा') मराठी आहे किंवा नाही याबद्दल एखादे प्रतिज्ञापूर्वक आणि जाहीर विधान आपण करू शकल्यास कदाचित या संदर्भात अनमोल मदत होऊ शकेलसे वाटते.
आगाऊ आभार.