मोनियरच्या शब्दकोशात jval असे विचारल्यावर खालील शब्द मिळाले :

प्रयोजके : ज्वलयति‌/ज्वालयति‌ :  जाळणे. 
जाज्वलति/जाज्वल्यते : जोरजोरात जळणे.
जाज्वल्यमान : चकचकीत, तेजस्वी.

ज्वाज्वल्य असे रूप सापडले नाही.

मराठीत, संस्कृतमधील जाज्वल्यमान या शब्दावरून (विद्यमानवरून सुविद्य होते तसे) जाज्वल्य हे विशेषण बनले असावे. 
---अद्वैतुल्लाखान