संग्राह्य आणि संग्रहणीय या शब्दांची गण्य आणि गणनीय या शब्दांशी तुलना करून पहायला हरकत नाही. मराठीत 'नगण्य' आहे, 'नगणनीय' नाही. या उलट, 'अगण्य' वापरला जात नाही, पण 'अगणित' जातो.
इतर भारतीय भाषांत कदाचित अगण्य आणि अगणनीय यांचा रूढ वापर असेलही.
दक्षिणी भारतीय भाषांच्या संदर्भात वाचताना असे समजले की, तेलगू आणि मल्याळी या भाषांत वापरले जाणारे ९० टक्के शब्द निव्वळ संस्कृत(तत्सम, तद्भव नाही!) आहेत. हिंदीतही संस्कृत शब्दांचा वारेमाप वापर होतो; मराठीत त्या मानाने कमीच!
---अद्वैतुल्लाखान