प्रभाकरराव,
हृदयाला चरका लावलात तुम्ही.
तिन्ही भाग वाचूनच अभिप्राय द्यावा असे ठरवले होते त्यामुळे आधी लिहिले नाही. तोपर्यंत बहुतेकांनी दाद दिलीच आहे त्या सर्वालाच डिट्टो !
कथेचा/कथानकाचा तोल आणि बांधणी फारच उत्तम साधली आहे. जरी कथा करूण असली तरी ती केविलवाणी नाही. संकटाला , दुःखाला सर्व पात्रे समर्थपणे आणि धैर्याने तोंड देतात. त्यांच्यात कुठेहि हताशपणा नाही. तसेच अवास्तव कलाटण्या नाहीत. सर्व प्रसंग अगदी रोजच्या वातावरणातले आणि बहुसंख्य वाचकांच्या अनुभूतीशी जवळिक करणारे आहेत म्हणूनच ते हृदयाला भिडले.
आपली पाचही पात्रे डोळ्यापुढे साकार करण्यात तुम्ही पूर्ण यशस्वी झाला आहात. मध्यमवर्गीय शहरी संस्कृतीचे सद्यकाळातील अचूक वर्णन तुम्ही केले आहेत. कारुण्याला व्यवहाराची लावलेली झालर ही आशेच्या पंखा पेक्षा जास्त पटली.
धन्यवाद,
सुभाष