मनोरंजक वाचनीय आठवण.
त्यावरून आठवलं. चि. वि. जोशींच्या "हिवाळा आला" या लेखात मार्क ट्वेनचा एक किस्सा सांगितलाय. मार्क ट्वेनला उशीरापर्यंत झोपण्याची संवय होती. एकदा तो पॅरिसला गेला असताना त्यानी तिथल्या सूर्योदयाविषयी ऐकलं नि आपणही सूर्योदय पाहावा असं त्याला वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठण्याचं ठरवून तो आदल्या दिवशी संध्याकाळीच झोपायला गेला. जाग आल्यावर उठून त्यानी हॉटेलच्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पाह्यलं. मंद प्रकाश पाहून सूर्योदय अजून व्हायचाय या कल्पनेनी तो ब्लँकेट गुंडाळून हॉटेलच्या गच्चीवर गेला. त्यानी एकवार आकाशात पाह्यलं नि नंतर खाली रस्त्यावर पाह्यलं. रस्त्यावरून अनेक लोक येत जात होते. त्यातल्या एका तरुण टोळक्याचं लक्ष ब्लँकेट गुंडाळलेल्या मार्क ट्वेनकडे गेलं. त्यातल्या एकानी त्याला ओरडून विचारलं, "काय महाशय? सूर्यास्ताची शोभा पाहाताय काय?" तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण काल संध्याकाळपासून आज संध्याकाळपर्यंत ताणून दिली होती.