कॉप्युटेशनल लिंग्विस्टिकवरची ही सुविधा कशी वापरायची ते मला पुरेसे कळलेले नाही. मात्र तेथे ज्वज्वल असे भरल्यास काहीही उत्तर मिळत नाही; पण जज्वल असा शब्द भरल्यास काहीसे उत्तर मिळते. अर्थात मिळालेल्या उत्तराचा कसा उपयोग करायचा तेही मला कळलेले नाही. माहितगारांनी माहिती दिल्यास बरे होईल.
मला थोडेफार कळाले ते असे : जज्वल शब्दाबद्दल कॉंप्युटेशनल लिंग्विस्टिकवर विचारणा केल्यावर -
जज्वल <जज्वल { ( कर्तृवाच्य ) ज्वल् ( [ भ्वादिगण ] [ सेट् ] [ अकर्मक ] ) ( [ लिट् ] ) मिप्* ( [ परस्मै ] [ उत्तम-पुरुष ] [ एकवचन ] ) } > असे येते. स्पष्टीकरण : जज्वल हे ज्वल् या भ्वादि म्हणजे पहिल्या गणातील सेट् प्रकारच्या अकर्मक धातूचे लिट् या काळाचे(म्हणजे परोक्ष/दुसऱ्या भूतकाळाचे) मिप् हा परस्मैपदी प्रत्यय लागून झालेले कर्तृवाच्य(=कर्तरी प्रयोगाचे) उत्तम-पुरुषी(म्हणजे थर्ड पर्सन/तृतीय पुरुषी) एकवचनी रूप आहे.
*ह्या प्रत्ययाला मिप् का म्हटले आहे याचे स्पष्टीकरण सापडले नाही.
ज्वल् या धातूची परोक्ष भूतकाळाची रूपे अशी आहेत. :
प्रथम पुरुष : जज्वल/जज्वाल जज्वलिव जज्वलिम
द्वितीय पुरुष : जज्वलिथ जज्वलथुः जज्वल
तृतीय पुरुष : जज्वाल जज्वलतु: जज्वलु:
थोडक्यात काय तर, जज्वल हे रूप प्रथम आणि द्वितीय पुरुषी आहे आणि जज्वाल हे प्रथम आणि तृतीय पुरुषी.
वरती जज्वल आणि जज्वाल यांचा काही संबंध नाही असे म्हटले आहे ते तितकेसे बरोबर नाही.
कॉंप्युटेशनल लिंग्विस्टिक या संकेतस्थळाचे अनेकपदरी उपयोग करता येतात, हे ध्यानात आले. या स्थळाची ओळख करून दिल्याबद्दल महेश यांना धन्यवाद!
---अद्वैतुल्लाखान