काटाकाटी खेळतांना सहसा जो पतंग काटायचा त्याच्यावरनं सर्रकन् आपला पतंग खाली आला पाहीजे. एकदा मांज्यात मांजा गुंतला की मग ढील देणं आणि हापसणं या दोन गोष्टी आणि मांज्याचा दर्जा यावर कोणाची पतंग कटणार ते ठरतं. काटाकाटीत आसारी धरणारा महत्त्वाचा असतो योग्य वेळी फुल ढील देणं आणि हापसल्यावर गुंता न होऊ देता मांजा गुंडाळणं हे कौशल्याचं काम असतं. असे सगळे पतंग काटत आपला पतंग एकटा आकाशात उडत राहणं म्हणजे विजयोत्सव असायचा.

फार दिवसांनी अनुभवातून उतरलेला चांगला लेख वाचला आणि लहानपणात घेऊन गेला,  चित्रंपण भनाट, धन्यवाद!

संजय