संक्रांतीला पोरं दिवसभर गच्चीवर गाणी लावून दंगा करतात; जेवायची पण शुद्ध नसते. वारं नसलं की, नुसती घालमेल होते. पण दिवस संपता-संपता, प्रत्येकाने आनंदाने घालवलेला दिवस, पुन्हा लवकर यावा अशा अपेक्षेने शिडी ऊतरून पत्र्यावरून खाली येतो. दुसऱ्या दिवशीपासून आकाश रंगहीन होतं ते पुढील दिवाळीपर्यंत!