पतंगांचा पेच झाला की तो पुढे लढवत राहायचे दोन प्रकार मी पाहिलेले आहेत.

पहिल्यात वाऱ्याच्या जोरावर भिस्त असते. म्हणजे पेच झाला रे झाला की मांज्याला ढील देत सुटायचे म्हणजे वाऱ्याच्या जोराने पतंग पुढे पुढेजाऊन मांज्याने दुसऱ्याचा मांजा कापला जातो.

दुसऱ्या प्रकारात पेच झालारे झाला की झपाट्याने मांजा हापसायला सुरवात करायची. ह्या दुसऱ्या प्रकाराला 'हापसाहापशी' असे नाव ऐकल्यासारखे वाटते. बहुधा वारा पुरेसा जोराचा नसताना हापसाहापशी करतात असे वाटते. पहिल्या प्रकाराला काय नाव आहे कल्पना नाही.