मधनं मधनं खांबाला अशी काही मिठी मारायचा की आपण खुद्द श्रीक्षेत्र गांडगांपूरलाच आलोत की काय वटायचं!
त्या क्षेत्राचे नाव आपण लिहिल्याप्रमाणे नसून, 'गाणगापूर' असे आहे, असे वाटते. (चूभूद्याघ्या. )
( यावरून आठवले:
शालेय वयात आम्हा वर्गमित्रांत एक खेळ बराच लोकप्रिय होता. काहीसा 'माझ्या आईचं पत्र हरवलं'ची आठवण करून देणारा. त्यात, प्रतिपक्षाच्या मातुःश्री बदलीच्या नोकरीवर आहेत असे गृहीत धरून, त्यांची बदली श्रीक्षेत्री करून देण्यात येत असे. असे वाक्य उच्चारण्याकरिता योग्य त्या आघातांसहित. त्या वयात - पौगंडावस्थेत - खूप मजा येत असे. कारण, खेळाबरोबरच, एक थोरामोठ्यांनी ऐकल्यास मार मिळू शकेल असा प्रतिबंधित अपशब्द उच्चारल्याचे समाधान मिळत असे. काहीसे सापाच्या चिथावणीने सफरचंद खाताना ईव्हला मिळाले असेल तसे. आणि तेही तसा अपशब्द प्रत्यक्षात न उच्चारता! आता आठवून फक्त हसू येते.
असो. आपल्या 'टंकनदोषा'ने - आता त्याला 'टंकनदोष'च म्हणण्याचा प्रघात आहे - जुन्या स्मृतींना उजाळा मिळाल्याबद्दल आपले खूपखूप आभार.)