मला शब्दापेक्षा अर्थ महत्त्वाचा वाटतो त्यामुळे मी शब्दाच्या बाबतीत फार काटेकोर नसतो, जसा बोलला जातो तसा शब्द मी लिहितो.
संदर्भांच्या बाबतीत ही तसंच आहे, संदर्भ एखाद्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी असतो त्यात चूक होऊ शकते.
शुद्धलेखनाच्या बाबतीत तडजोड होऊ शकत नाही हे मान्य पण मनोगतवर बहुतेक वेळा मूळ विषय बाजूला राहतो आणि शब्द हा बरोबर की तो बरोबर याचेच प्रतिसाद बेसुमार येतात.
अशामुळे विषयातली मजा निघून जाते (हा लेख माझा नाही म्हणून बरं! )
संजय