वरचं वारं लागणेला थाप लागणे म्हणतात. दुपारी दोन प्रकारचे वारे वहात असते- एक आडवं आणि त्याच्या वर- साधारणपणे १०० ते २०० मीटरवर- दुपारच्या उन्हाने हवा तापुन वर-वर जात असते. ह्या आडव्या वाऱ्याने पतंग नेहमी सारखा उडतो. पण त्यावरच्या वाऱ्याला लागला की, अक्षरशः ९० अंशात वर जातो. अशा वेळी गोती लागुन जर पतंग कटला तर तो कित्येक किमी लांब जाऊन पडल्याची उदाहरणे आहेत. नगरच्या आजुबाजुच्या गावात असे कटलेले पतंग जातात.