प्रभाकर, बऱ्याच दिवसांनी एक हृदयस्पर्शी कथा वाचली. तिसऱ्या भागाच्या मध्यावर शेवटाची जराशी कल्पना आली होती तरीही मनाला चटका लागलाच.

यशवंत देवांच्या 'भातुकलीच्या खेळामधली' ह्या गीताचीही आठवण आली. उणीपुरी ५० वर्ष एकमेकांच्या साथीने राहिलेल्या पती पत्नींना त्यांच्यातला एखादा डाव मोडून जर उठून गेला तर काय वाटत असेल.....  त्या भावना पूर्ण ताकदीने आपण या कथेतून सादर केल्यात - आपल्या अत्यंत साध्या, सरळ व सोप्या लेखनशैलीमुळे कथेची ताकद अजून वाढली.... सुंदर कथा येथे दिल्याबद्दल धन्यवाद.

माधव