पतंगाच्या नक्षी वरून पतंगांना खालील नावे पडली आहेत ..
रुमाल : हा पतंग २ रंगात असतो. पतंग सरळ पकडला की वरच्या टोकाकडून डाव्या आणि उजव्या टोकांकडे साधारण एक इंच जाडीचा वेगळ्या रंगाचा पट्टा जातो. अश्या पतंगाला रुमाल म्हणतात
डोळा : पतंगाचा बहुतेक भाग एका रंगाचा असतो पण मध्येच मोरपिसाच्या आकाराचा एक डोळ्यासारखा दिसणारी नक्षी असते. ही वेगळ्या रंगांमध्ये असते.
डोळे : वरती वर्णन केल्याप्रमाणेच पण ह्याला २ डोळे असतात.
ढेकूण : ह्या पतंगावर विविध आकारच्या चौकोनांची नक्षी असते. ह्याला ढेकूण का म्हणत असावेत हे काही माहीत नही बुवा.
गिड्डा : संपूर्ण पतंग एकाच रंगाचा असतो.
चौकडा : पतंगावर चार वेगळ्या रंगाचे ( किंवा २ रंग आलटून पालटून ) चौकोन असतात.
भवरा : ह्यामध्ये २ रंग असतात. पतंग सरळ उभा पकडल्यास त्याचा खालचा अर्धा भाग आणि वरचा अर्धा भाग वेगवेगळ्या रंगाची असतात.
चांद तारा : ह्यात पतंगाच्या मध्यभागी चंद्र आणि शुक्र एकमेकांच्या जवळ दाखवलेले असतात. बाकी पतंग एका रंगात असतो (बहुतांश - काळ्या रंगात )
तिरंगा : आपल्या भारताच्या झेंड्याप्रमाणे ३ रंगीत पट्टे असतात. रंग कोणतेही असू शकतात. पट्टे उभे किंवा आडवे असू शकतात.
असे अनेक प्रकार आहेत ...