कुमारजी,

आपल्या प्रतिसादा बद्दल आणि बरकाईने गजल वाचल्या बद्दल धन्यवाद. आपल्य्य दोन्हीही सुचनांची नोंद घेतली आहे. या संदर्भात माझेच योग्य असा अग्रह किंवा दुराग्रह न धरता मला असे वाटतेः-

या वृत्ता मधे ओळीच्यामध्यानंतर "गा गा ल" या मत्रांचा शब्द प्रयोग हवा आहे. त्यात बरसात हा शब्द बसतो. आपण केलेली सुचना पण मात्रेत बसणारी आहे.

या शेरात मला संख्यात्मक दृष्टीने शायर खूप झाले आहेत असे सुचवायचे आहे. आहेत ते शायर खूप लिहितात असे नाही, आपली दुरुस्ती स्विकारल्यास मला अभिप्रेत अस्लेला अर्थ येणार नाही असे मला वाटरे.

मला वाटते आपला माझ्या गजलेस पहिलाच प्रतिसाद असावा. एका सुजाण वाचकाच्या नजरे खालूनगजल गेल्याचा मला आनंद आहे. आपल्या प्रतिसादाची मला नेहमीच प्रतीक्षा राहील.

धन्यवाद