धन्यवाद माधव,
साध्या, सोप्या आयुष्यातले हे चढऊतार मागे राहीलेल्या प्रेमाच्या माणसांच्या अक्षरशः अंगावर येतात. ते गांगरून जातात, सावरायला बराच वेळ लागतो. पण प्रेमाच्या माणसांची साथ सुटणं हेही वास्तवच असतं. स्विकारावचं लागतं.
वेदश्री,
काय लिहू मी. वर माधवला दिलेला प्रतिसाद वाच. तसेच, प्रत्यक्ष जीवनांत ज्यांच्या वाट्याला ही अनपेक्षित दुःखे येतात त्यांची अवस्था काय होत असेल?
माझ्या वडीलांचे १९९६ ला के.ई.एम्. मध्ये निधन झाले. त्यांच्या आणि माझ्या आयुष्यातले ते २२ दिवस आणि विशेषतः शेवटचा अर्धा तास (पहाटे ३ ते ३.३०) मी कधीच विसरू शकणार नाही. आपली माणसं जन्मभर आपल्या सोबत राहावीत, त्यांनी आपला हात कधीच सोडू नये असं, एक नियती वगळता, प्रत्येकालाच वाटत असतं. असो.
तुझा अपेक्षाभंग झाला याचं मलाही वाईट वाटतय. पण 'यशोदे'ला सोडून अमेरिकेत मुला-नातवंडासमवेत सुखात राहणं अप्पांना तरी जमलं असतं का?