वर बरेच नवे शब्द आले आहेत. काही आणखी.
आट्या = मांजा मोजायचे माप. हाताचा पंजा ताणायचा आणि अंगठा आणि करंगळी यांच्या भोवती मांज्या एकदा गुंडाळला की एक आटी . असा किती आट्या मांज्या असे मोजायचे.
आसारी = हिच्या भोवती मांज्या गुंडाळलेला असतो.
रिग्गा = मांज्याची खर कोठे कोठे निघून जाते आणि आतला धागा उघडा पडतो. तिथे मांज्या कमकुवत झाल्याने तुटण्याची शक्यता असते. ह्या भागाला रिग्गा म्हणतात. (मांजाला रिग्गा पडला आहे असे)