प्रभाकर, मनाला हेलावणारा शेवट... आप्पा यशोदेच्या मृत्यूने खचून जातील असे वाटलेले पण इतक्या पटकन तिला भेटायला जातील असे अपेक्षित नव्हते अर्थात नेहमीच आपल्या वाटते तसे घडतेच असे नाही म्हणा. पतीपत्नी आयुष्यभरच एकमेकांची काळजी करत नाहीत तर मरणोत्तरही सहचाऱ्याची तरतूद करून ठेवतात, याचे सहजपणे दिलेले विश्लेषण.. संपूर्ण कथा छान...
मध्यमवर्गीय वर्तुळातील पात्रांना शोभणारे संवाद, राहणीमान(बगलेत ओघळलेले, भोकाचे गंजीफ्रॉक), आर्थिक परिस्थिती या सर्व वैशिष्ट्यांमुळे कथानकाला वेगळेच रूप मिळाले आहे. चाळीत राहणाऱ्या शेजाऱ्यांना शेवटपर्यंत असणारी आपुलकी, प्रेम हेही भावले.
अजून एक विशेष संदेश जाणवला... लेखकाला अभिप्रेत असेल नसेल पण... जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी, जसे जमेल आणि जेव्हा जमेल तेव्हा आपल्या आईवडिलांना/प्रिय व्यक्तिंना भेटत राहावे..
प्रभाकर धन्यवाद आणि पुढेही लिहित राहाल अशी आशा..
श्रावणी