मुळात विषयच इतका वेड लावणारा आहे की....
मी कधीच फार उत्तम पतंग उडवणारा नव्हतो. दुसऱ्याचा पतंग कापणे सोडाच, पण आपला पतंग गोता न खाता हवेत उडत ठेवणे हीच माझ्यासाठी मोठी कसोटी असे (म्ह. अजूनही आहे). त्यातून पतंग भिरभिऱ्या /अस्थिर असेल तर संपलच. कोणत्याही प्रकारची कणी बांधलेली असताना, हवा कमी/जास्त असताना गच्चीतून/रस्त्यावरून पतंग लीलया उडवूशकणारे अनेक मला माहिती आहेत. आणि त्यांच्या त्या कलेबद्दल मला अपार आदर वाटतो!
पण तरीही या खेळाचे, विशेषतः संक्रांतीच्या वेळी असलेल्या त्या वातावरणाचे मला खूपच आकर्षण आहे. म्हणूनच प्रतिसाद द्यावासा वाटला. असे विषय म्हणजे आता स्वप्नवत वाटणाऱ्या आपल्या बालपणाला जोडणारे दुवेच.
जवळ जवळ सर्वच गल्लीतले खेळ आपापली परिभाषा घेऊन येतात. उदा. भोवरा, गोट्या, वगैरे.. पतंग त्यातील सर्वात उंच!