श्रावणी,
धन्यवाद.
शक्य असेल तर सोडून जाऊच नाही. पण दूर राहणे कर्मप्राप्तच असेल तर निदान सतत संपर्कात राहावे. आता तर इलेक्ट्रॉनिक माध्यम एवढे पुढे गेले आहे की चॅटिंगच्या मार्गे आपण रोजच आपल्या प्रियजनांना 'भेटू' शकतो. तरीपण उतारवयातील मातापित्यांची, प्रत्यक्ष भेटीची तहान इलेक्ट्रॉनिक माध्यमही, भागवू शकत नाही. ते रुजलेल्या भूमीतून त्यांना उचलून, या वयात, परदेशात, परक्या भूमीत रुजवणेही शक्य नसते. कांही कांही समस्यांवर तोडगाच नसतो हेच खरं.
श्री. सर्वसाक्षी,
कांही चुकांचे उघडपणे कितीही समर्थन केले किंवा त्यांना कितीही यशस्वीरित्या झाकून ठेवले तरी सुसंस्कृत मनाला लागणारी बोचणी जन्मभर साथ देते. या बोचणीतून सुटका मिळविण्यासाठीच या चुकांची कधीतरी कोणाजवळ तरी कबुली द्यावी लागते. त्या दिशेने येणारी पहिलीच संधी पकडून मनावरचा बोजा हलका करावा हे उत्तम.