श्री. मन,

" काका , हे नेहेमी असंच का होतं हो? "
दैनंदिन जीवनांत माणूस अनेक लहानसहान दुःखांनी व्याकूळ होत असतो. आज काय तर माझ्या जवळ फ्रिज नाही, उद्या काय तर वातावरणात उकाडाच फार आहे. कधी मुलाने १०वी किंवा १२वीच्या परीक्षेत टक्के कमी आणले तर कधी बायको/नवरा माझ्या मनासारखे वागत नाही, मला समजूनच घेत नाही. लहान पणी शिकलेले 'स्मॉल' आणि 'बिग' हे शेप्स् विसरलेला असतो. म्हणून मग देव माणसाच्या आयुष्यात एक मोठ्ठ दुःख आणून देतो. त्यामुळे माणसाला 'लहान' आणि 'मोठ्ठ' दुःख यातील फरक कळून लहान दुःखांकडे बघण्याचा त्याचा 'नजरीया' बदलतो. या साठी 'युनिसेफचे' एक पोस्टर मला नेहमी लक्षात ठेवायला आवडते,  'I always complained that I had no shoes, until I saw a man who had no feet'. अशी मोठी दुःखं आपल्या वाट्याला देण्या मागे हेच तत्त्वज्ञान आपल्याला शिकविण्याचा हेतू  ईश्वराचा असावा, असे मला वाटते.
अभिप्राया बद्दल धन्यवाद.

श्री. मालकंस,
आपण म्हणता तसेही असेल कदाचीत.
अभिप्राया बद्दल धन्यवाद.